…आणि मुख्यमंत्री स्टॅलिन लाजले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन वयाची 68 वर्षे गाठूनही शारीरिकदृष्टय़ा एकदम फिट आहेत. त्याचे कारण ते रोज पहाटे उठून शहरातील बागेत चालायला जातात. आपले मुख्यमंत्री चक्क ट्रकसूट परिधान करून जॉगिंग करीत आहेत हे पाहताच बागेत फिरणाऱ्या वयस्कर महिलांना आश्चर्य वाटले. त्यांनी मुख्यमंत्री स्टॅलिन यांना सर याही वयात तुम्ही इतके फिट कसे, असा प्रश्न विचारला. महिलांच्या या प्रश्नाने स्टॅलिन चक्क लाजले आणि त्यांनी उत्तर दिले, मी आजही तरुण दिसण्याचे मुख्य रहस्य आहे माझा रोजचा ‘मॉर्निंग वॉक.’ मुख्यमंत्र्यांच्या साधेपणाने त्या महिलाही प्रभावित झाल्या. त्यांनी स्टॅलिन यांच्या सरळ, साध्या स्वभावाला प्रणाम करीत आपला पुढचा रस्ता धरला. सोशल साइट्सवर सक्रिय स्टॅलिन यांनी या प्रसंगाचा व्हिडीओ डीएमकेच्या ट्विटर अकाऊंटवर टाकला आहे. त्याला नेटकऱ्यांनी जोरदार प्रतिसाद दिला आहे.