तामीळनाडूत बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला वाचवण्याचे प्रयत्न सुरू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तामीळनाडूतील तिरुचिरापल्ली जिल्हामध्ये बोअरवेलमध्ये पडलेल्या तीन वर्षाच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न रविवारपासून सुरू आहेत. हा मुलगा विहिरीत 100 फूटांवर अडकला आहे. या मुलाला वाचवण्यात यश येत नाही, तोपर्यंत बचावकार्य सुरुच ठेवण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारच्या अधिकाऱ्याने दिली आहे. सुजीत विल्सन असे बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाचे नाव आहे.

मन्नापराई जिल्ह्यातील नादुकट्टूपट्टी येथे बोअरवेलमध्ये अडकलेल्या मुलाला वाचवण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. त्याला वाचवण्यात अनेक अडचणी येत आहेत. मात्र, कोणत्याही परिस्थितीत बचावकार्य थांबवण्यात येणार नाही, असे आयुक्त राधाकृष्णन यांनी सांगीतले. घराजवळ असलेल्या बोअरवेलजवळ खेळत असताना सुजीत विल्सन हा तीन वर्षांच्या मुलगा शुक्रवारी बोअरवेलमध्ये पडला. त्यावेळी तो 35 फुट खोलीवर अडकला होता.मात्र, त्याला वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांमुळे तो आणखी खोल गेला आणि आता तो 100 फूटांवर अडकला आहे. रविवारी संध्याकाळी 5.30 वाजेपासून तो त्या ठिकाणी अडकला आहे. त्या ठिकाणी त्याला ऑक्सिजन पुरवण्यात येत आहे. या बचावकार्यात 6 गट कार्यरत आहेत. सद्यस्थितीत मुलगा सुरक्षित असून त्याचा श्वासोश्वास नियमित सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.