
गेल्या सहा आठवडय़ांपासून पूर्व लडाखच्या सीमेवर असलेला ‘स्टॅण्ड ऑफ’ लवकर संपण्याची शक्यता आहे. लेफ्टनंट जनरल स्तरावरील अधिकाऱयांच्या तब्बल 11 तासांच्या चर्चेनंतर ‘एलएसी’वरून चीनचे सैन्य छू होणार आहे. आपले सैन्य येथून माघार घेण्यावर दोन्ही देशांची सहमती असल्याचे वृत्त आहे.
पूर्व लडाखच्या गलवान खोऱयात 15 जून रोजी झालेल्या हिंसक संघर्षात हिंदुस्थानचे कर्नल संतोष बाबू यांच्यासह 20 जवान शहीद झाले होते. यावेळी हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चीनच्या कमांडिंग ऑफीसरसह काही सैनिक ठार झाले. यानंतर प्रत्यक्ष ताबा रेषेवर (एलएसी) तणाव वाढला होता.
लष्करप्रमुख लडाखमध्ये; शूर जवानांची घेतली भेट
15 जूनला गलवान खोऱयात चिनी सैनिकांना धडा शिकविणाऱया जखमी शूर जवानांवर लडाखच्या मिलिट्री हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शूर जवानांची भेट घेवून प्रपृतीची विचारपूस केली. त्यानंतर ते लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग यांच्याशी चर्चा करणार आहेत.
24 जून लेह येथे वरिष्ठ कमांडर्सची महत्त्वपूर्ण बैठक होणार असून, पूर्व लडाखच्या स्थितीबाबत चर्चा होईल. 5 मे रोजी चिनी लाल माकडांनी पूर्व लडाखच्या ‘एलएसी’ परिसरात घुसखोरी केली. हिंदुस्थानने अनेक वेळा लष्करी आणि राजनैतिक पातळीवर चर्चा केली. मात्र, चीनच्या पुरापती कमी झाल्या नाहीत. हिंदुस्थाननेही ‘एलएसी’वर जवानांची गस्त वाढविली. गेली सहा आठवडे ‘स्टॅण्ड ऑफ’ होता.
हिंदुस्थानच्या वतीने लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आणि चिनी सैन्याच्या बाजूने मेजर जनरल लिचू लिन यांच्यात सोमवारी तब्बल 11 तास चर्चा झाली. ‘एलएसी’वर चीनच्या भागात मोल्डो परिसरात ही बैठक झाली. 5 मे पूर्वीची परिस्थिती जैसे-थे ठेवावी. चिनी सैन्याने माघारी जावे, अशी स्पष्ट भूमिका हिंदुस्थानने मांडली. ही बैठक सकारात्मक पार पडली. दोन्ही देशांमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यावर सहमती झाली.
त्यामुळे दोन्ही देशांचे सैन्य मागे हटणार आहे. दरम्यान चीनच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत चर्चा सकारात्मक झाल्याचे म्हटले आहे.
6 जून रोजी लेफ्टनंट जनरल स्तरावरील पहिली बैठक झाली होती. चीनने मागे फिरावे यावर एकमतही झाले होते. एक करारही करण्यात आला होता. मात्र, चिनी लालमाकडांनी 15 जूनला गलवान खोऱयात हिंसक संघर्ष केला. त्यात हिंदुस्थानचे 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानी जवानांनीही जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात चीनचे 43 सैनिक ठार झाले होते.




























































