चिन्यांची आगळी मोहीम, कोरोनाची माहिती स्वतः कळवणाऱ्या रुग्णाला 10 हजार युआन ईनाम

839
corona

जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या प्रसाराचा मोठा धसका चिनी सरकारने घेतला आहे. आतापर्यंत 2800 नागरिकांचा बळी घेणाऱ्या या रोगाची लागण चीनमधील सुमारे 80 हजार नागरिकांना झाली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी चिनी प्रशासनाने आता या रोगाचे रुग्ण शोधण्यासाठी वेगळीच शक्कल लढवलीय. ज्या रुग्णाला कोरोनाची लागण झाली असेल त्याने स्वतः रुग्णालयाला अथवा वैद्यकीय प्रशासनाला कळवल्यास आणि तो रुग्ण खरेच कोरोनाग्रस्त असेल तर सरकार त्याला 10 हजार युआन इनाम देत त्याच्यावर योग्य ते उपचारही करणार आहे.

चीनच्या कोरोनाग्रस्त हुबेई प्रांताच्या नजीकच्या प्रांतांतही आता नागरिकांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आहे. त्यामुळेच हुबेईच्याच कियानजिंग, हानयांग आणि हुआंगगुआंग प्रशासनांनी कोरोनाची माहिती देणाऱ्या रुग्णाला 10 हजार युआन बक्षीस देण्याची घोषणा केली आहे. कोरोनाच्या अधिकाधिक रुग्णांनी उपचारासाठी पुढे यावे हा या मोहिमेचा हेतू आहे. चीनच्या एका हुबेई प्रांतातच कोरोनाचे 65 हजार रुग्ण आढळले असून 2,600 नागरिकांचा या आजाराने बळी घेतला आहे. याशिवाय जियांगशी आणि हेबेई या स्थानिक प्रशासनांनी अशी माहिती देणाऱ्या रुग्णांना 300 ते 500 युआन बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या