लडाखमध्ये चीनकडून शस्त्र आणि सैन्याची जमवाजमव

लडाखमधील चीनच्या कुरघोडय़ा अद्याप थांबलेल्या नाहीत. पॅन्गाँग सरोवराजवळील सैन्य चीनने मागे घेतले असले तरी जवळच्याच रुटोगमध्ये आता शस्त्र आणि सैन्याची जमवाजमव सुरू केली आहे. रुटोगच्या लष्करी तळाचे चीनकडून अत्याधुनिकीकरण करण्यात येत असल्याचे उपग्रहांच्या माध्यमातून मिळालेल्या छायाचित्रांवरून स्पष्ट झाले आहे.

‘द इंटेलिजन्स’ने 11 मे रोजी रुटोगमधील छायाचित्रे उपग्रहांमार्फत घेतली. रुटोगमध्ये चीनने युध्द वाहने आणि शस्त्रसाठी तैनात केला आहे. त्याचप्रमाणे थंड वातावरणात जवानांना उष्णता मिळावी म्हणून तंबूही उभारल्याचे छायाचित्रांमध्ये दिसत आहे.

उपग्रहांची नजर चुकवण्यासाठी काही बराकी झाकूनही ठेवल्या गेल्या आहेत. रुटोगमध्ये चीनने प्रचंड प्रमाणात शस्त्रसाठा लपवून ठेवल्याचे लष्करी तज्ञांची माहिती आहे. लडाखजवळील सीमेवर अक्साई चीन येथेही चीनकडून युध्दपातळीवर पायाभूत सुविधा निर्माण केल्या जात आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या