चीनकडून नागरिकांच्या जिवाशी खेळ, हजारो नागरिकांना टोचली असुरक्षित लस

चीनमधून संपूर्ण जगात कोरोनाचा फैलाव झाला होता. संपूर्ण जग या विषाणूशी लढत आहे. आता चीनने हजारो नागरिकांना असुरक्षित लस टोचली आहे. यामुळे चीन आपल्याच नागरिकांच्या जिवाशी खेळत असल्याचे समोर आहे.

न्युयॉर्क टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार चीन सरकारने अनेक मजूर, शिक्षक, सरकारी अधिकार्‍यांना कोरोनाची लस टोचली आहे. चीनने जी लस आपल्या नागरिकांना दिली आहे त्या लशीला जागतिक स्तरावर कुठेच मान्यता दिलेली नाही. तरी चीनने सरकारने हे धाडस केले आहे. चीन सरकारने लशीसंदर्भात मोठी योजना आखली आहे. अनेक नागरिकांना ही लस टोचली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तिथले नागरिक याला विरोधही करू शकत नाहीत.

ज्यांना ज्यांन ही लस टोचली आहे त्यांच्याकडून एक बेकायदेशीर करार करून घेण्यात आला आहे. या लशीबद्दल बाहेर अवाक्षर काढायचे नाही तसेच माध्यमांशीही याबात बोलायचे नाही असे या लोकांकडून लिहून घेण्यात आली आहे. दरम्यान ही लस किती जणांना देण्यात आली आहे हे अद्याप कळालेले नाही. बीजींगमधील सिनोवॅक कंपनीनुसार बीजींगमध्येअ आतापर्यंत 10 हजारहून अधिक लोकांना ही लस देण्यात आली आहे. तसेच कंपनीचे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांनाही ही लस देण्यात आली आहे.

चीनने अप्रमाणित आणि मान्यता नसलेली लस नागरिकांना दिल्यामुळे तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच या लशीचे दुष्परिणाम नागरिकांना भोगावे लागेल असेही तज्ज्ञांनी म्हटले आहे. या लशीमुळे कोरोना बरा होईल की नाही याचीही शाश्वती नाही.

आपली प्रतिक्रिया द्या