कश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवा, चीनने पाकिस्तानचे कान उपटले

484

चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या हिंदुस्थान दौऱयाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या कश्मीर धोरणात बदल केला आहे. कश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवा अशा शब्दांत चीनने पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे कान उपटले.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान हे दोन दिवसांच्या चीन दौऱयावर आले आहेत. आज त्यांनी राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट घेतली. कश्मीर प्रश्नावर दोन्ही देशांची भूमिका सारखीच आहे. चीनने पाकिस्तानला कश्मीर प्रश्नावर नेहमीच साथ दिली आहे, मात्र राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या हिंदुस्थान दौऱयाच्या पार्श्वभूमीवर चीनने आपल्या भूमिकेत लवचिकता आणली आहे. कश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडवा असे फर्मानच इम्रान खान यांना सोडले. कश्मीरातील परिस्थिती जैसे थे ठेवण्यात यावी असे चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या