चंद्रावर पोहोचण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. काही महिन्यांपूर्वी हिंदुस्थानने चंद्राच्या दक्षिणी ध्रुवावर चांद्रयान 3 चे यशस्वी लँडिंग करून इतिहास रचला होता. त्यानंतर आता चीनने चंद्रावर अंतराळ स्थानक उभारण्याची घोषणी केली. याआधी चीनने स्वतःचे अंतराळ स्थानक निर्माण केले आहे. चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सचे उपाध्यक्ष डिंग चिबियाओ म्हणाले, चीनने अंतराळ संशोधन उपक्रमांचा 2050 पर्यंतचा रोडमॅप जारी केला आहे. चीनने सुरू केलेले आंतरराष्ट्रीय चंद्र संशोधन केंद्र 2028 ते 2035 या काळात उभारले जाईल. तिथे राहून अंतराळ यात्री आणि शास्त्रज्ञ संशोधन करतील. पहिल्या टप्प्यात 2027 पर्यंत चीन अंतराळ स्टेशनचे संचलन, मानवयुक्त चंद्र मोहीम आणि अन्य ग्रहांच्या मोहिमांवर काम करेल.