धक्कादायक! सनस्क्रीनमुळे तरुणीच्या 10 फासळ्या तुटल्या

1999

जर तुम्ही ऊन व धूळीपासून त्वचेचे संरक्षण व्हावे यासाठी सनस्क्रीन वापरत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. कारण याच सनस्क्रीनमुळे चीनमध्ये एका तरुणीच्या एक दोन नाही तर चक्क 10 फासळ्या तुटल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. झेजियांगमध्ये राहणाऱ्या या तरुणीचे नाव जियाओ माओ (20) असे असून ती नेहमी सनस्क्रीनचा वापर करायची.

सनस्क्रीनचा अतिवापर केल्याने जियाओची हाडे ठिसूळ झाली होती. जियोमध्ये आधीच व्हिटामिन डी ची कमतरता होती. त्यासाठी ती गोळ्या घेत होती. पण सनस्क्रीनमुळे तिची हाडे अधिकच ठिसूळ झाली. विशेष म्हणजे सतत खोकला येत असल्याने जियाओ डॉक्टरकडे गेली होती. त्यावेळी तिला अॅलर्जिक अस्थमा असावा असे डॉक्टरांना प्रथम वाटले. पण जेव्हा छातीच्या उजव्या बाजूला तिला भयंकर वेदना होऊ लागल्या तेव्हा डॉक्टरांनी तिला काही चाचण्या करण्यांचा सल्ला दिला. त्यात जियाओच्या 10 फासळ्या तुटल्याचे व हाडे ठिसूळ झाल्याचे निदान झाले.

हे बघून डॉक्टरही हैराण झाले. जियाओच्या हाडांची घनता ही इतर चीनी महिलांच्या तुलनेने खूपच कमी असल्याचे चाचणीत आढळले. व्हिटॅमीन डी च्या कमतरतेमुळे हाडे ठिसूळ झाली असावी असे डॉक्टराना वाटले. पण ती अतिप्रमाणात सनस्क्रीन वापरत असल्याने ज्यातून नैसर्गिक व्हिटामीन डी मिळते ती सूर्याची किरणे तिच्या हाडांपर्यंत पोहचत नव्हती. यामुळे तिची हाडे वेगाने ठिसूळ होऊन तिच्या फासळ्या तुटल्या असे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या