चीनमधून आली चांगली बातमी, एप्रिल एंड ठरणार कोरोना प्रसाराचा ‘टर्निंग पॉईंट’

4448

जगभरात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना व्हायरसमुळे कारभार ठप्प झालेत, दैनंदिन व्यवहारात देखील विस्कळीत झाले आहेत, अनेक लोक आहे तिथेच अडकून पडले आहेत. अशावेळी कोरोनाचा प्रसार कधी संपुष्टात येणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

चीनच्या वुहान शहरातून कोरोनाला सुरुवात झाली. डिसेंबर महिन्यात पहिला रुग्ण आढळला. त्यानंतर दोन महिन्यात जगभरात 8 लाखहून अधिक लोक या कोरोनामुळे बाधित झाले. मात्र वुहान यातून बाहेर पडले असून आता हळूहळू पूर्वपदावर येत आहे. विशेष म्हणजे एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा हा कोरोना व्हायरस संदर्भात ‘टर्निंग पॉईंट’ ठरणार आहे, असे बीजिंगमधील मुख्य वैद्यकीय सल्लागार डॉ. झोन्ग नॅनशान (वय वर्ष 83) यांनी सांगितले आहे. कोरोनाने जगाला हादरा दिला असला तरी त्याला रोखण्यासाठी सर्व देशांनी कंबर कसली आहे. जवळपास सर्वच देशांनी कोरोनापासून बचावासाठी योग्य पावलं उचलल्याने कोरोनाग्रस्तांचा चढता आलेख उतरणीला आल्याचे दिसेल. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना प्रसाराचे प्रमाण अत्यल्प असेल असा अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. योग्य ती दक्षता घेतल्यास कोरोना प्रसार रोखू शकतो, हाच यावर उपाय असल्याचे ही ते म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या