चीनचा लडाखमधील हॉटप्रिंग, गोगरापासून मागे हटण्यास नकार

लडाखमधील चीन आणि हिंदुस्थानी सैन्यातील चकमकी संपवण्यासाठी सुमारे वर्षभर चर्चेच्या फेऱ्या सुरू आहेत, पण चीनचा हटवादीपणा संपता संपत नाहीय. आमचे सैन्य पेंगाँग सरोवरापासून दूर हटलेय त्यातच समाधान माना, असे सांगत चीनने लडाखच्या हॉटस्प्रिन्ग आणि गोगरा विभागातून सैन्यमाघारीला ठाम नकार दिला आहे. आतापर्यंत उभय देशांच्या लष्करात चर्चेच्या 11 फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. पण चीन मात्र लडाख सीमेवरील काही भागांतून हटायला तयार नाहीय. 9 एप्रिलला चीन आणि हिंदुस्थानी लष्कराच्या कमांडर्सची 11 वी बैठक पार पडली. त्या बैठकीत आमचे सैन्य लडाखच्या हॉटप्रिंग, देपसांग मैदान आणि गोगरा पोस्टपासून मागे हटणार नाही असा हट्ट चीनने धरला आहे. हिंदुस्थानी सैन्य गेल्या दोन-तीन वर्षांत पेंगाँग सरोवराच्या फिंगर 8 पर्यंत पोहचू शकलेले नाही. कारण चिनी सैन्य हिंदुस्थानी जवानांना या भागात गस्त घालायला सतत विरोध करीत आलेले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या