लॉकडाऊनमध्ये खा खा खाल्ले, वजन झाले 277 किलो

3995

चीनच्या वुहानमधून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे अनेक देशात लॉकडाऊन जारी करण्यात आला. आजही चीनमध्ये अनेक भागात लॉकडाऊन जारी आहे. वुहानमध्येच एक तरुण लॉकडाऊनमध्ये फक्त खात होता. शरीराची कुठलीच हालचाल नसल्याने या तरुणाचे वजन 277 किलो झाले आहे.

वुहानमध्ये झोऊ हा तरूण आधीपासून जाड होता. लॉकडाऊनपूर्वी तो एका सायबर कॅफेमध्ये काम करत होता. नंतर लॉकडाऊन जारी झाल्यापासून तो घरी होता. पाच महिने तो घरी राहून फक्त खायचा. फार हालचालही नाही करायचा. त्यामुळे पाच महिन्या त्याचे वजन 100 किलोंनी वाढले. आधीच मर्कट त्यात मद्य प्यायला अशी अवस्था या तरुणाची झाली.

नंतर जेव्हा झोऊच्या छातीत दुखु लागले तेव्हा डॉक्टरांना पाचारण करण्यात आले. कारण झोऊला डॉक्टरांकडे नेणे शक्य नव्हते. झोऊची अवस्था पाहून डॉक्टरही चक्रावून गेले. अखेर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेव्हा त्याला आयसीयुत हलवण्यात आले तेव्हा 6 सुरक्षा कर्मचारी आणि 4 वैद्यकीय अधिकार्‍यांची चांगलीच दमछाक झाली. वजन वाढल्यामुळे झोऊ हृदय विकाराचा झटकाही आला होता. सध्या त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या