चिंकी ऑलिम्पिकसाठी पात्र ठरणारी 11वी हिंदुस्थानी नेमबाज

624

दोहा येथे सुरू असलेल्या 14 व्या आशियाई अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत हिंदुस्थानच्या चिंकी यादवने गुरुवारी 25 मीटर पिस्तूल प्रकारात रौप्यपदक पटकावले आणि टोकियो ऑलिम्पिकसाठीचे आपले तिकीट बुक केले. चिंकी ऑलिम्पिकसाठीची पात्रता सिद्ध करणारी 11 वी हिंदुस्थानी नेमबाज ठरली आहे. याआधी 25 मीटर पिस्तूल गटातून महाराष्ट्राच्या राही सरनौबतने ऑलिम्पिक पात्रता मिळवली आहे.

 चिंकीने महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात एकूण 588 अंकांसह रौप्यपदक पटकावले. या प्रकाराचे सुवर्णपदक थायलंडच्या नाफास्वान यांगपाइबून हिने 590 अंकांसह पटकावले. तिने अंतिम फेरीत अफलातून कामगिरी करीत 296 अंकांची कमाई केली.

आपली प्रतिक्रिया द्या