जातीनिहाय गणनेवरून देशात राजकारण सुरू आहे. केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी रविवारी सांगितलं की ते जातीनिहाय जनगणनेच्या पक्षात आहेत.
रविवारी पत्रकार परिषदेत जात जनगणनेबाबत त्यांच्या भूमिकेबद्दल विचारले असता ते म्हणाले, ‘माझा पक्ष (लोजप) नेहमीच जात जनगणनेच्या बाजूने असल्याची भूमिका स्पष्ट करतो’.
अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री म्हणाले की केंद्र सरकारने जातनिहाय जनगणना का करावी यामागे अनेक कारणे आहेत.
‘याचे कारण असे आहे की, अनेक वेळा राज्य आणि केंद्र सरकार लाभार्थ्यांची जात लक्षात घेऊन अनेक योजना तयार करतात. मागासवर्गीय लोकांना मुख्य प्रवाहात जोडण्याच्या विचाराने त्या योजना तयार केल्या जातात’, असं ते म्हणाले.
‘अशा परिस्थितीत, सरकारकडे त्या जातीनिहाय लोकसंख्येची माहिती असणे आवश्यक आहे जेणेकरून ते रकमेचे योग्य वाटप करू शकेल’, ते म्हणाले.
चिराग पासवान हे या आठवड्याच्या सुरुवातीलाच सरकारी नोकऱ्यांमध्ये लेटरल प्रवेश नियुक्तीच्या संकल्पनेच्या विरोधात बोलले होते.
त्यांनी संघ लोकसेवा आयोग (UPSC) मध्ये लेटरल प्रवेशाला ‘पूर्णपणे चुकीचे’ म्हटलं होतं.
महत्त्वाची बाब म्हणजे, LJP हा भाजपचा एक प्रमुख मित्रपक्ष आहे.
काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की, सत्तेत आल्यास ते देशव्यापी सामाजिक-आर्थिक जातीनिहाय जनगणना करेल.