
अखिल भारतीय मराठी नाटय़ परिषद, मध्यवर्ती मुंबईच्या वतीने ‘नाटय़ परिषद करंडक’ या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेत नाटय़शृंगार, पुणे या संस्थेच्या ‘चिरंजीव परफेक्ट बिघडलाय’ या एकांकिकेने बाजी मारत प्रथम पारितोषिक पटकावले.
शतक महोत्सवी अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनानिमित्त सुरू झालेला ‘नाटय़कलेचा जागर’ दरवर्षी महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांनी साजरा केला जात आहे. यंदा ‘नाट्य परिषद करंडक’ ही स्पर्धा दोन फेऱ्यांमध्ये संपन्न झाली. 23 व 24 ऑगस्टला महाराष्ट्रातील विविध 19 केंद्रांवर प्राथमिक फेरी घेण्यात आली. यातील निवडक 25 एकांकिकेची अंतिम फेरी 15 ते 18 सप्टेंबर या कालावधीत माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण नाट्यसंकुलात संपन्न झाली. उत्साहपूर्ण वातावरणात, अनेक नावीन्यपूर्ण विषयांच्या एकांकिका अंतिम फेरीत सादर झाल्या.
…आणि विजेते आहेत
सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – ज्ञानेश्वर तुपे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट अभिनेता – श्रेयश जोशी (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रियांका जाधव (रेशनकार्ड), लक्षवेधी अभिनेता – वैभव रंधवे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), लक्षवेधी अभिनेत्री – पयोष्णी ठाकूर (लोककलेच्या बैलाले पो), नेपथ्य – ऋतुजा बोठे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), प्रकाशयोजना – अभिप्राय कामठे (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट लेखन – विनोद रत्ना (चिरंजीव परफेक्ट बिघडलाय), सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा- शुभम माथुरकर (लोककलेच्या बैलाले पो).