मराठी माझी पितृभाषा- चंकी पांडे

1656

>> नम्रता पवार

चंकी पांडे… एक गुणी अभिनेता… विनोदाची उत्तम जाण… मोकळा… मजेशीर स्वभाव… आता तो मराठीतही येतोय….

सुयश शरद पांडे उर्फ चंकी पांडे. डॉ. शरद आणि डॉ. स्नेहलता पांडे यांचा मुलगा. 19च्या दशकात अनेक हिंदी चित्रपट त्याचा नावावर जमा होते. तेजाब मधील त्याचा बब्बन कायमच लोकांच्या लक्षात राहिला. त्यासाठी त्याला फिल्म फेअर चं नॉमीनेशन देखील मिळालं होतं.हळूहळू खानानंची सद्दी सुरु झाली आणि हा अभिनेता बांगलादेशच्या सिनेसृष्टीचा सुपरस्टार झाला. हिंदी हिट चित्रपट ते बांगला सिनेमाचा सुपरस्टार वाया विनोदी अभिनेता तेअभिनेत्री अनन्या पांडेचा पिता आणि आता ’विकून टाक ’द्वारे मराठी चित्रपटातील पदार्पण या सर्वांविषयी मारलेल्या गप्पा….

चंकी, तू प्रथमच ’विकून टाक ’या मराठी चित्रपटातून पदार्पण करत आहेस काय सांगशील या बद्दल?
मराठीत आज हिंदी चित्रपटसृष्टीतील अनेक नामवंत चेहरे काम करत आहेत, त्यामुळे मी देखील मला हि संधी केव्हा मिळतेय याची मी वाटच पाहत होतो आणि मला ही संधी मिळाली. विकून टाक ‘हा ग्रामीण भागातील एक विनोदी बाज असलेला चित्रपट आहे. त्यातून एक सामाजिक संदेश दिला गेलाय. समीर पाटील चा मी पोस्टर बॉइज ’बघितला होता. तर निर्माते हितेंद्र पाटील यांनी यापूर्वी यल्लो ’चित्रपटाची निर्मिती रितेश देशमुख सोबत केली होती त्यामुळे नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता.मी लहानाचा मोठा…अगदी माझे वडील सुद्धा लहानाचे मोठे मुंबईत झाल्यामुळे माझी मराठीशी कायमची नाळ जुळंलीय. त्यामुळे मी नेहमी गमतीने म्हणत असतो कि हिंदी ही माझी मातृभाषा आहे तर मराठी ही माझी पितृभाषा आहे. मराठीत काम करून मी खरोखर ते म्हणतात ना ‘गंगा नहा लिया.. ’तसंच काहीसं माझं झालंय. 31 जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होतोय. याबरोबरच जवानी जाने हा हिंदी चित्रपट प्रदर्शित होतोय. यामुळे एकाचवेळी माझे दोन चित्रपट प्रदर्शित होताहेत माझ्या साठी खूप आनंदाची गोष्ट आहे.

हिंदी चित्रपटात तू सुरवातीला नायकाच्या भूमिकेत होतास अचानकपणे विनोदी अभिनेता म्हणून कशी ओळख निर्माण केलीस?
चित्रपटातील हिरो ते विनोदी अभिनेता ही माझी ओळख खरंतर हाऊसफुल चित्रपटातील आखरी पास्ता या माझ्या व्यक्तिरेखेमुळे निर्माण झाली. मग अपना सपना मनी मनी ’मध्ये साकारलेला नेपाळी देखील खूप भाव खाऊन गेला. लोकांना माझं काम आवडलं. तशाच प्रकारच्या भूमिका मिळू लागल्या आणि विनोदी अभिनेता म्हणून ओळख निर्माण झाली. विकून टाक चित्रपटातील अरबी कॅरेक्टर देखील असंच विनोदी अंगाने जाणार कॅरेक्टर आहे. आणि तेदेखील लोकांच्या पसंतीस उतरणार आहे.

आज इतकी वर्ष सिनेसृष्टीत काम करत आहेस. खास मराठी सहकलाकारांबद्दल काय सांगशील?
माझा स्वभाव एवढा छान मजेशीर आहे की माझं सगळ्यांशीच खूप छान जमतं. माझे अनेक मराठी सह कलाकार मित्र आहेत. माझ्या कारकिर्दीत मी अनेक मराठी लोकांसोबत काम केलंय. खूप मेहनती असतात. त्यांची भाषा खूपच शुद्ध असते. आवाजावर प्रचंड मेहनत घेतात. एकतर अनेकजण रंगभूमी कलाकार असल्यामुळे त्यांच्याबद्दल प्रचंड आदरभाव असतो. नाना पाटेकर, माधुरी दीक्षित, पद्मिनी कोल्हापुरे, श्रेयस तळपदे, रितेश देशमुख, जयंत वाडकर, एन चंद्रा, अशा सर्वांसोबत माझे आजही घरोब्याचे संबंध आहेत.

चंकी.,तू स्वतःला पक्का मुंबईकर समजतोस. मग खास महाराष्ट्रीयन पदार्थ कोणते आवडतात?
होय. मी पक्का मुंबईकर आहे. माझ्या घरी गणपती बाप्पा येतो तेव्हा 11दिवस माझ्या घरी उकडीचे मोदक आणि पुरणपोळी केली जाते जी मला अत्यंत प्रिय आहे. वरणभात, बटाटय़ाची पिवळी भाजी, आगरी सुकं मटण आणि तांदळाची भाकरी, कोळी पद्धतीचं हिरव्या वाटणातील कोळंबी, मासे खूप आवडतात. नागपूरचं सावजी मटण, कोल्हापुरी मिसळ, तांबडा -पांढरा रस्सा आणि माझ्या मुंबईचा वडापाव खूप आवडीने खातो.

तुझी मुलगी अनन्या पांडे हिंदी चित्रपटात काम करतेय काय सांगशील?
अनन्या अभ्यासात खूपच हुशार होती. ती तिच्या आजी- आजोबासारखीच डॉक्टर होणार असंच आम्हाला वाटलं होत.मात ती तेरा वर्षाची असताना अभिनेत्री होणार असल्याच सांगितलं तेव्हा मी यागोष्टीच स्वागतच केल मात्र तिला सांगितलं कि अभ्यास हा करावाच लागणार. 16 व्या वर्षी तिने अभिनेत्री व्हायच अगदीच मनावर घेतलं, तेव्हा मी तिला एका प्रोडक्शन हाऊसमध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करायला सांगितलं,.कारण या क्षेत्रात किती मेहनत करावी लागते हे मला तिला दाखवून द्यायचं होतं. त्याचप्रमाणे अकटिंग कलासेस ला पाठवलं. तोपर्यंत ती 12वी चांगल्या गुणांनी पास होऊन तिला अमेरिकेतील दोन चांगल्या विद्यापीठात प्रवेश देखील मिळाला होता. यादरम्यान तिला स्टुडंट ऑफ द इअर 2 चित्रपटाची ऑफर आली. आमचे सगळे नातेवाईक, मित्रमंडळ यांचं म्हणणं होतं की अनन्याने शिक्षणाकडे महत्त्व द्यायला हवं. अभिनय नंतर देखील करता येईल. आमच्यावर खूपच दबाव होता. शेवटी अनन्याला मी विचारलं की, तुला काय करायचंय.. तिने मला स्पष्टपणे सांगितलं की मी चार वर्षाने पदवी मिळवून आले तरी मी अभिनेत्रीच होणार आहे. त्यामुळे हा चित्रपट मी करणारच. तेव्हा मी तिला परवानगी दिली. तसंच अमेरिकेतील तिच्या कॉलेजच्या डीनना तिला तिची अडचण सांगितली आणि तिचे मार्क्स पाहून त्यांनी तिला तिचा प्रवेश दोन वर्ष तसाच ठेवण्याची हमी दिली. यानंतर अलीकडेच तिचा ’पती पत्नी और वो चित्रपट प्रदर्शित झालाय. यामध्ये तिच्या कामाचं कौतुकही खूप झालंय.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या