तुम्ही कोणता इतिहास वाचला आहे; कपिल सिब्बल यांची अमित शहांवर टीका

517

राज्यसभेत नागरिकता सुधारणा विधेयकावर चर्चा करताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली आहे. लोकसभेत विधेयकावर चर्चा करताना अमित शहा यांनी काँग्रेसवर देशाची फाळणी केल्याचा आरोप केला आहे. तो पूर्णपणे चुकीचा आहे. त्यामुळे अमित शहा यांनी त्यांचा आरोप मागे घ्यावा, असे सिब्बल म्हणाले. शहा यांनी इतिहासाचे नेमके कोणते पुस्तक वाचले आहे, असा सवाल करत सिब्बल यांनी शहा यांच्यावर टीकाही केली.

द्विराष्ट्र सिद्धांत काँग्रेसचा नसून तो सिद्धांत वीर सावरकरांचा आहे, असा दावा सिब्बल यांनी केला. त्यामुळे शहा यांनी त्यांचा आरोप मागे घ्यावा. हे विधेयक द्विराष्ट्राच्या सिद्धांताला संवैधानिक दर्जा देत आहे. नागरिकत्वासाठी हे विधेयक धर्माचा आधार घेत आहे. अमित शहा यांनी इतिहासाचे नेमके कोणते पुस्तक वाचले आहे, अशी टीकाही त्यांनी केली. द्विराष्ट्राचा सिद्धांत काँग्रेसचा नसून तो वीर सावरकरांचा आहे, असे विचार आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे शहा यांनी त्यांचा आरोप मागे घ्यावा, असे सिब्बल म्हणाले.

देशातील मुस्लीमांनी घाबरून जाऊ नये, असे शहा म्हणत आहेत. मात्र, आम्ही किंवा देशातील मुस्लीम तुम्हाला किंवा तुमच्या सरकारला घाबरत नाही. आम्ही संविधानाचा आदर करणारी माणसे आहोत, असे सिब्बल म्हणाले. हे विधेयक देशाची विभागणी करणारे आहे. भाजपचा अजेंडा आम्हांला माहित आहे. लव्ह जिहाद, एनआरसी, कलम 370 आणि नागरिकत्व सुधारणा विधेयक हा अजेंडा देशाला माहित आहे, असेही सिब्बल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या