नगर परिषद, जिल्हा परिषद लढणार आणि जिंकणार; रोह्यातील शिवसैनिकांचा निर्धार

कोणत्याही क्षणी नगर परिषद तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यासाठी शिवसैनिक सज्ज असून रोह्याची नगर परिषद आणि जिल्हा परिषद आम्ही लढणार आणि जिंकणारच, असा निर्धार शिवसेनेचे पदाधिकारी व शिवसैनिकांनी व्यक्त केला आहे. कुणी कितीही आमिषे दाखवली तरी येथील मतदार हे ठामपणे शिवसेनेच्याच पाठीशी उभे राहतील, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

भाटे वाचनालयाच्या सभागृहात रोह्यातील शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मार्गदर्शन करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी शिंदे गटाच्या राजकारणावर टीकेची झोड उठवली. ते म्हणाले की, शिवसैनिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असला तरी तो अजिबात यशस्वी होणार नाही. गेली अडीच वर्षे सर्वसामान्य जनतेला फसवणाऱ्यांना त्यांची जागा मतदार दाखवून देतील, असेही सुरेंद्र म्हात्रे यांनी सांगितले.

या मेळाव्यास जिल्हाप्रमुख नंदू शिर्के, जिल्हा संपर्कप्रमुख प्रसाद भोईर, जिल्हा संघटक स्विटी गिरासे, सुधीर सोनावणे, कुलदीप सुतार, नितीन वारंगे यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विधानसभा संघटक प्रमोद कासकर, युवासेनेचे पदाधिकारी किशोर काटारे, रमेश विचारे, सुधीर सोनावणे, चंद्रकांत यादव, बबन मोहिते, कुलदीप सुतार, तनुजा धुरे, सचिन फुलारे, दुर्गेश नाडकर्णी, प्रेरीत वलीवकर, मनोज तांडेल, यतिन धुमाळ, राजेश काफरे, चंद्रकांत कडू, मनोज लांजेकर, प्रकाश वलीवकर, चंद्रकांत कारभारी, ओंकार गुरव, सागर भगत, भारत वाकचौरे, ज्ञानेश्वर दळवी आदी उपस्थित होते.