सिव्हील सर्व्हिसेस भरती चार वर्षांत घसरली; केंद्रीय मंत्र्यांचे स्पष्टीकरण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

यूपीएससी परीक्षेद्वारे सिव्हील सर्व्हिसेसमध्ये होणारी भरती गेल्या चार वर्षांत खूपच घसरली असून 2018-19 या आर्थिक वर्षात ती सर्वाधिक खाली म्हणजे 2352 अंकांवर स्थिरावली आहे, असे केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी गुरुवारी राज्यसभेत सांगितले. यूपीएससीद्वारे 2015-16 या आर्थिक वर्षात 3750 उमेदवारांनी नागरी सेवांच्या परीक्षा उत्तीर्ण केल्या होत्या. मात्र हाच आकडा हळूहळू घसरायला लागला.

2016-17मध्ये ही संख्या 3020 उमेदवारांवर आली, तर त्यानंतर 2017-18 या वर्षात 3083 उमेदवार उत्तीर्ण झाले, तर गेल्या वर्षी 2018-19मध्ये केवळ 2352 उमेदवारांनी सिव्हील सर्व्हिसेस परीक्षा उत्तीर्ण केली, असेही केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी आपल्या लेखी उत्तरात आकडेवारीसह स्पष्ट केले.