
अटल सेतूवर सेल्फी घेण्यावरून दोन गटांमध्ये हाणामारी व लुटमारीची घटना घडली होती. याप्रकरणी अटक केलेल्या तरुणाला 20 दिवसांनंतर सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला. तक्रारदाराचा ग्रुप सेल्फी घेताना जोरजोरात ओरडत होता. त्यावरून काद झाला. नंतर आरोपींनी त्यांच्या गाडीचा पाठलाग करीत धमकावून मोबाईल व पैसे लुटले. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी दानिशला अटक केली होती.



























































