कोपरगावात घराच्या जागेच्या वादातून मारहाण; तीन जखमी, सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

492
fight
file photo

कोपरगावात गुरुवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास आरोपींनी काहीजणांना जमवले आणि घराच्या जुन्या जागेच्या वाद उकरून काढत मारहाणीला सुरुवात केली. या मराहणीत तीनजण जखमी झाले असून त्यात दोन मुलांचा समावेश आहे. याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यात अशोक रामचंद्र गुंजाळ, कलाबाई बापु शिंदे, सुनिल अशोक गुंजाळ, अनिल अशोक गुंजाळ, गणेश अशोक गुंजाळ, ताराबाई अशोक गुंजाळ ,आशाबाई सुनिल गुंजाळ (सर्व रा. टाकळीनाका, कोपरगाव) यांचा समावेश आहे. या सात जणांविरुद्ध कोपरगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, गुरुवारी सकाळी 9 वाजेच्या सुमारास संजय नगर येथे शंकर रमेश गुंजाळ यांच्या घरासमोर या आरोपींनी शिवीगाळ करत त्यांना ठार मारण्याची धमकी दिली. तसेच काठीने, लाथाबुक्क्यांनी त्यांना मारहाण केली. यात शंकर रमेश गुंजाळ ( वय 38), शिवराज परशुराम गुंजाळ ( वय 17), हर्षल शंकर गुंजाळ ( वय12, सर्व रा. संजयनगर) हे तिघे जखमी झाले असून त्यांच्यावर कोपरगाव ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल आर. पी. पुंड तपास करीत आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या