सोनम वांगचुक यांचे उपोषण मागे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी 28 जूनपासून उपोषणाला बसलेले सोनम वांगचुक यांनी 26 दिवसांनी उपोषण मागे घेतले. वांगचुक यांना मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती खालावत चालली होती. सरकारने त्यांना दोन मागण्यांबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर त्यांनी गुरुवारी रात्री उशिरा उपोषण मागे घेतले. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि डॉ. जितेंद्र सिंह यांच्या हस्ते ज्यूस पिऊन त्यांनी उपोषण थांबवले.

संसदेवर मोर्चा काढणाऱ्या विद्यार्थ्यांवर कोणतेही गुन्हे दाखल होणार नाहीत, आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना नुकसानभरपाई आणि सरकार संसदेत पेपरफुटी आणि परीक्षांमधील उत्तरदायित्व ठरविण्याबाबत चर्चा घडवून आणेल, ही आश्वासने सरकारने दिली. प्रधान यांच्या राजीनाम्याबाबत कोणतेही आश्वासन देण्यात आले नाही. अशा वेळी आठवडाभर उपोषण सुरू ठेवत मृत्यूला कवटाळणे किंवा लढा सुरू ठेवणे, हे दोनच पर्याय समोर होते. हा लढा सुरू राहिला पाहिजे, म्हणून मी उपोषण मागे घेत असल्याचे वांगचुक यांनी सांगितले.