क्लाऊड मोनेटचे चित्र सात अब्ज 74 कोटींना विकले

सामना ऑनलाईन । न्यूयार्क

फ्रान्समधील सुप्रसिद्ध प्रभाववादी चित्रकार क्लाऊड मोनेट यांच्या एका चित्राचा नुकताच लिलाव झाला. या लिलावात हे चित्र तब्बल ११ कोटी डॉलर्सला (जवळपास ७ अब्ज ७४ कोटी रुपये) विकले गेले. चित्राच्या विक्रीचा हा एक विक्रमच म्हणायला हवा. मिळालेल्या माहितीनुसार, क्लाऊड मोनेट यांनी हे चित्र १८९० साली रंगवले होते. त्यांचे हे चित्र त्यांच्या ‘हेयस्टॅक्स’ सीरिजचा एक भाग होते. ‘मेलस’ असे नाव असलेल्या या चित्राला जगभरात मोठ्या आदराचे स्थान आहे. लिलाव सुरू झाला तेव्हा या चित्राची किंमत साडेपाच कोटी डॉलर्स सांगण्यात आली होती. लिलाव सुरू होताच आठव्या मिनिटांला हे चित्र ९ कोटी ७० लाख डालर्सना विकले गेले. नंतर कर आणि कमिशन वगैरे धरून अखेरीस त्याची किंमत ११ कोटी ७ लाख डॉलर्सपर्यंत पोहोचली.