देशभरात मान्सून धमाका जोरदार सुरू असून अनेक राज्यांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांत हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, केरळ, उत्तराखंड आदींचा समावेश आहे. हिमाचल प्रदेशात मुसळधार पाऊस सुरू असताना यादरम्यान रामपुरामध्ये ढगफुटी झाली आहे.
मंडीमध्येही मुसळधार पावसामुळे चंदीगड-मनाली राष्ट्रीय महामार्ग बंद करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये गंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून धोका असलेल्या चिन्हापेक्षा फक्त 1 मीटर खाली वाहत आहे. त्यामुळे सखल भागात पाणी साचल्याने सुमारे 50 हजार लोकांना पुराचा फटका बसला आहे.