मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची भेट घेऊन त्यांच्याकडे राजीनामा सोपविला आहे. फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाचा व सरकारचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपणार असल्याने मुख्यमंत्र्यांनी त्यांचा राजीनामा राज्यपालांकडे सादर केला.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा स्वीकारला आहे. शनिवारपासून देवेंद्र फडणवीस यांची राज्यपालांनी काळजीवाहू मुख्यमंत्री नेमणूक केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत याबाबत सांगितले आहे. ‘महाराष्ट्रात पुढील सत्ता स्थापन होईपर्यंत किंवा पुढिल निवडणूका होईपर्यंत मलाच काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून काम करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र या कार्यकाळात मी कोणताही धोरणात्मक निर्णय घेऊ शकत नाही’, असे फडणवीस यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या