मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी, डॉक्टर आत्महत्येप्रकरणी पंकजा मुंडे यांची मागणी

फलटणमध्ये एका डॉक्टर तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या तरुणीने पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घ्यावी आणि न्याय द्यावा अशी मागणी मंत्री पंकजा मुंडे यांनी केली आहे.

पंकजा मुंडे म्हणाल्या की, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल. याबाबात मीडिया ट्रायल होऊ नये. न्याय मिळालाच पाहिजे. एक सुशिक्षित डॉक्टर, जी इतक्या लोकांचे प्राण वाचवते, तिला ज्या परिस्थितीतून जावे लागले, ते अत्यंत दुर्दैवी आहे. आपल्या गृह मंत्र्यांनी आणि मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची दखल घेऊन न्याय मिळेल याची खात्री करावी, अशी मागणी मुंडे यांनी केली आहे.