बावनकुळे हे आमचा हिरा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्याचे ऊर्जामंत्री आणि नागपूर जिह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत विरोधकांनी चिंता करण्याचे कारण नाही. बावनकुळे हे आमच्या पक्षाचे हिरा आहेत. त्यांच्या भवितव्याची जबाबदारी आमची आहे. भविष्यात त्यांना यापेक्षाही मोठे पद देऊ, असे अभिवचन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी कन्हान येथील जाहीर सभेत दिले.

यावेळी फडणवीस यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची भरभरून प्रशंसा केली. त्यांचा आम्ही भविष्यात नक्कीच विचार करू. ते आज जे आहेत त्यापेक्षा नक्कीच मोठे झालेले दिसतील, असेही आश्वासन दिले. या विधानसभा निवडणुकीत ज्या विद्यमान मंत्र्यांना तिकीट नाकारले गेले त्यापैकीच एक आहेत. त्यामुळे ते नाराज असल्याची चर्चा सध्या जिह्यात सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्र्यांनी बावनकुळेंचा असा उल्लेख केल्याचे सांगितले जात आहे.