सर्व शाळांना मराठी शिकवणे सक्तीचे : मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती

48

सामना ऑनलाईन । मुंबई

राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे आहे. मात्र, काही सीबीएससी आणि आय़सीएससी बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्यात येत नसल्याचे समोर आले आहे. राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे आहे. खासगी, सीबीएससी, आयसीएससी किंवा कोणत्याही बोर्डाच्या शाळांना हा नियम लागू आहे. काही शाळा या नियमाचे पालन करत नसतील तर त्याची योग्य ती दखल घेण्यात येईल. तसेच सर्व शाळांमध्ये मराठी शिकवणे सक्तीचे करण्यासाठी कायदा अधिक कठोर करून त्यात आवश्यक ते बदल करण्यात येतील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली.

शिवसेनेच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी औचित्याच्या मुद्द्यांद्वारे हा प्रश्न सभागृहात उपस्थित केला होता. त्यावर राज्यातील शाळांमध्ये मराठी सक्तीचे असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्यासाठी कायद्यात आवश्यक ते बदल करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. तसेच मराठी भाषेसाठी, संवर्धनासाठी आणि साहित्याबाबतच्या विविध मागण्यांसाठी सोमवारी भेटीसाठी येणाऱ्या शिष्टमंडळाला भेटणार असून त्यांच्या मागण्या जाणून घेऊन त्यावर योग्य ते निर्णय घेण्यात येतील असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या