
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना चर्चेचे खुले आव्हान दिले आहे. दिल्लीकरांनी भाजपला का मतदान करावे हे अमित शहांनी सांगावे असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे. एका वृत्तसंस्थेशी बोलतना केजरीवाल यांनी हे आव्हान दिले आहे.
केजरीवाल म्हणाले की दिल्लीच्या जनतेचे प्रत्येक मत मला मिळेल. जो कोणी भाजपला मतदान करे त्याचे मतदान वाया जाईल. दिल्लीच्या जनतेच्या मनात खूप प्रश्न आहेत. गेल्या पाच वर्षात अमित शहा यांनी दिल्लीसाठी काय केले की त्यांनी भाजपला मत द्यावे.” दिल्लीत चारही बाजूने कचरा एकत्र केला जात आहे? या सारख्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली तर बरे होईल. दिल्लीच्या लोकांसमोर शहा यांना मी चर्चेचे निमंत्रण देतो. आम्हाला 21 व्या शतकातला हिंदुस्थान निर्माण करायचा आहे. आपल्याकडे योग्य लोक आसून आपली व्यवस्था वाईट आहे असे केजरीवाल म्हणाले.

























































