मुख्यमंत्री केजरीवाल यांनी घेतली अमित शहांची भेट, शाहीन बागवर चर्चा नाही

676

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे. या भेटीत शाहीन बागवर कुठलीच चर्चा झाली नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

भेटीनंतर मुख्यमंत्री केजरीवाल म्हणाले की, ही चांगली भेट होती. मैत्रीपूर्ण वातावरणात चर्चा झाली. आमची अनेक मुद्द्यांवर जर्चा झाली. दिल्लीच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र काम करणे गरजेचे आहे. आम्ही एकत्र काम करू अशा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच 24 फेब्रुवारी रोजी विधानसभेचे सत्र बोलावल्याचे केजरीवाल यांनी सांगितले. या भेटीत शाहीन बागवर कुठलीच चर्चा झाली नसल्याचे केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

आपली प्रतिक्रिया द्या