Video – पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत मंचावर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज, भाषण देण्यास नकार

कोलकातामध्ये सुभाष चंद्र बोस यांची 125 वी जयंती साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी उपस्थित होते. या कार्यक्रमात ममता बॅनर्जी नाराज झाल्या आणि भाषण करण्यास नकार दिला.

जेव्हा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी बोलण्यास उभ्या राहिल्या तेव्हा प्रेक्षकांतून जय श्री रामच्या घोषणा देण्यात आल्या. तेव्हा बॅनर्जी म्हणाल्या की, हा सरकारी कार्यक्रम आहे. हा कुठलाही पक्षाचा कार्यक्रम नसून मला बोलावून अपमानीत करणे चुकीचे आहे. सरकारी कार्यक्रमाचा आदर ठेवला पाहिजे. याचा विरोध म्हणून मी काहीच बोलणार नाही असे बॅनर्जी म्हणाल्या.

आपली प्रतिक्रिया द्या