मुख्यमंत्री ठाकरे यांचा कामाचा धडाका, पहिल्या आठवड्यात केली ही कामे

5728

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी 28 नोव्हेंबरला शिवतीर्थावर मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यापासून ते आतापर्यंत या पहिल्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. याचा व्हिडीओ शिवसेनेच्या अधिकृत फेसबुक पेजवर शेअर करण्यात आलेला आहे.

मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवसेनाप्रमुख हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, संयुक्त महाराष्ट्र लढ्यातील हुतात्मे आणि मंत्रालयात राजमाता जिजाऊंच्या प्रतिमेला अभिवादन करत कामास सुरुवात केली.

मुख्यमंत्रीपदाच्या एका आठवड्याच्या कालावधीत उद्धव ठाकरे यांनी कोणत्याही विकास कामांच्या आड न येता अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. तसेच मुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी प्रशासनातील विविध विभागांतील सचिवांसोबत संवाद साधला. मंत्रीमंडळाच्या पहिल्यात बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी छत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रायगड किल्ल्याच्या संवर्धनासाठी 20 कोटी रुपये मंजूर केले.

आरे काडशेडच्या कामाला स्थगिती देऊन कारशेडला विरोध करणाऱ्या पर्यावरणप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले. कोकणातील नाणार रिफायनरी प्रकल्पाविरोधात आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याचे निर्देश दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सिअॅम ओशन वर्ल्डच्या धरतीवर मुंबईत जागतिक दर्जाचे मत्स्यालय उभारण्याच्या पर्यटन विभागाला सूचना दिल्या. मुंबईत साधारण दरवर्षी देश-विदेशातील जवळपास 60 लाख पर्यटक येतात त्यांना आकर्षित करून त्यातून होणाऱ्या उत्पन्नात बरीत वाढ होणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंत्री आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन महाराष्ट्रातील विकास प्रकल्पांचा आढावा घेतला. आढावा बैठकीमध्ये कोणत्याही विकाल कामांना स्थगिती आणि रद्द न करता विकास कामे अधिक गतीन करण्याकडे लक्ष देण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या