अन् मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपला ताफा थांबवला

9461

कोकण दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मालवण येथील प्री प्रायमरी स्कूलमधील मुलांचा उत्साह पाहून आपला ताफा थांबवत मुलांची भेट घेतली. मुलांची विचारपूस करत त्यांच्या सोबत फोटोही काढले. कोणताही बडेजाव न दाखवता अगदी सर्वसामान्य माणसाप्रमाणे मुख्यमंत्रीच आपल्या शाळेत आल्याने शिक्षक वर्गही भारावून गेला.

किल्ले सिंधुदुर्ग भेटीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेलिकॉप्टरने मालवणच्या टोपीवाला बोर्डिंग मैदानावर मंगळवारी सकाळी दाखल झाले. जवळच टोपीवाला जय गणेश स्कूल संलग्न श्रीमती सीताबाई श्रीपाद घुर्ये प्रीप्रायमरी स्कूल आहे. येथील मुले कुतूहलाने मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा, हेलिकॉप्टर हे सारे पाहत होते.

Video – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद

ताफा निघताच आपल्याकडे पाहणाऱ्या मुलांकडे मुख्यमंत्री यांचे लक्ष गेले. त्यांनी लागलीच ताफा थांबवला. सुरक्षा रक्षकांनाही नेमके काय झाले ते समजले नाही. मुख्यमंत्री थेट स्कूल परिसरात गेले. मुलांसोबत व शिक्षक वर्गासोबत फोटो काढले. यावेळी मुलांसह शिक्षकांचा आनंद ओसंडून वाहत होता. मुख्याध्यापिका श्वेता पेडणेकर व सर्व शिक्षक यावेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री यांच्या या साधेपणाची व सर्वसामान्य जनतेबद्दल असलेल्या आपुलकीची चर्चा मालवणात सुरू होती

आपली प्रतिक्रिया द्या