विनाकारण फिरण्यामुळे कोरोनाचा वाढता धोका, अनिर्बंध वावर रोखण्यासाठी 2 किमीचे निर्बंध

कोरोनाचे संकट शिखरावर असताना मुंबई आोणि परिसरात लोक विनाकारण फिरताना आणि वाहने बाहेर काढून रस्त्यावर गर्दी करताना दिसत आहेत. हे अजिबात अपेक्षित नाही. यामुळे कोरोनाची साथ जी आपण आटोक्यात ठेवली आहे ती मोठय़ा प्रमाणावर वाढून आपल्यासमोर आव्हान उभे राहील असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलिसांनी 2 किमी अंतराचे निर्बंध टाकले त्यामागे मुक्त आणि अनावश्यक वावराला रोखणे हाच उद्देश आहे असे स्पष्ट केले.

पावसाळा, कोरोना तसेच मुंबईसंदर्भातील इतर नागरी समस्यांवर आयोजित व्हिडीओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बोलत होते. या कॉन्फरन्समध्ये खासदार अनिल देसाई, परिवहन मंत्री अनिल परब, आमदार सुनील प्रभू यांनीही सहभाग घेऊन सुचना केल्या. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, एमएमआरडीए आयुक्त आर राजीव उपस्थित होते.

प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न केल्यास अधिकाऱयांवर कारवाई
प्रशासकीय कामकाजात आवर्जुन मराठीचा वापर करण्याबाबत सूचना दिल्यानंतरही अधिकाऱयांकडून त्यांचे पालन होत नाही. याची गंभीर दखल घेत मराठी भाषा विभागाने परिपत्रक जारी केले आहे. महापालिकांकडून मराठी भाषेचा सक्षमपणे वापर होत नाही. त्याचप्रमाणे मंत्रालयातील काही विभागांचे शासन निर्णयही मराठीतून काढले जात नाहीत. वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष केले जात असून प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर न केल्यास एक वर्षाकरिता पगारवाढ रोखण्यात येईल. त्याचप्रमाणे गरज पडल्यास अधिक कठोर कारवाई करण्यात येईल असे निर्देश मराठी भाषा विभागाकडून देण्यात आले आहेत.

मेट्रोमुळे तडे गेलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
परराज्यातील मजूर परतत आहेत त्यांची कोविड चाचणी व्हावी, मेट्रोच्या कामांसाठी जे कमी तीव्रतेचे स्फोट केले जात आहेत त्यामुळे काही ठिकाणी आजूबाजूच्या इमारतींना तडे गेले आहेत. मुंबई पालिकेने व एमएमआरडीएने मिळून या इमारतींचे बांधकामांचे बांधकाम ऑडीट करावे,स्थानिकांना कामांमध्ये प्राधान्य द्यावे अशा मुद्दय़ांवरदेखील बैठकीत चर्चा झाली. मेट्रोच्या कामांमुळे पावसाळ्यात पाणी साचून नागरिकांना त्रास होता कामा नये!

मेट्रो तसेच अन्य विकासकामांमुळे या पावसाळ्यात कुठेही पाणी साचून नागरिकांचे हाल होणार नाहीत याची काळजी घ्यावी. नाले स्वच्छता, साफसफाई करतांना लोकप्रतिनिधी तसेच इतर सर्वांच्या संपर्कात राहून तातडीने कामे पूर्ण करावीत असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले. पावसाळ्यामध्ये मेट्रोच्या कामांमुळे तयार झालेल्या खड्डय़ांत पाणी साचण्याचा आणि पर्यायाने दुर्घटना घडणे, रोगराई वाढण्याचा संभव असल्याने सर्व प्राधिकरणांनी एकत्र येऊन ही कामे पूर्ण करावीत. ज्या ठिकाणी कामे कामगारांअभावी खोळंबली आहेत तिथे तातडीने स्थानिक व्यक्तींना रोजगार देऊन ती सुरू करा. रेल्वे, बीपीटी, विमानतळ प्राधिकरण यासर्वांचा एकमेकांत समन्वय हवा, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या.

सलग दुसऱया दिवशी पोलिसांची धडक कारवाई, हजारो वाहने ताब्यात
महत्त्वा कामाशिवाय विनाकारण गाड्या घेऊन फिरू नका, नियमांचे पालन करा असा इशारा दिलेला असतानाही बेजबाबदारपणे गाडय़ा घेऊन फिरणाऱया हजारो चालकांवर पोलिसांनी आज सलग दुसऱया दिवशी धडक कारवाई केली. शहर व वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी करून हजारो वाहनं ताब्यात घेतली.

रविवारी एकाच दिवशी शहरात विनाकारण मोकाट फिरणाऱया जवळपास पाच हजार वाहनांवर कारवाई केली. आज सोमवारी दुसऱया दिवशीदेखील पोलिसांनी आणखी कडक नाकाबंदी करत बेजबाबदार चालकांवर कारवाई केली. आज एका दिवसात वाहतूक पोलिसांनी सहा हजार 241 दुचाकी, एक हजार 601 खासगी कार, 295 टॅक्सी, 474 तीनचाकी गाडय़ा ताब्यात घेतल्या. याशिवाय शहर पोलिसांनीदेखील कारवाया केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या