उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्यांचा महाराष्ट्राला सार्थ अभिमान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

579

शांतता व सुव्यवस्थेसाठी झटणाऱया तसेच संकटकाळी इतरांच्या बचावासाठी प्राणपणाने कामगिरी बजावणाऱयांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उल्लेखनीय कामगिरीसाठी राष्ट्रपती पदक पटकावणाऱया पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच जीवन रक्षा आणि अग्निशमन सेवा यांचे अभिनंदन केले आहे.

महाराष्ट्राला शौर्याची दिमाखदार परंपरा आहे. याच परंपरेत पोलीस दलातील वीरांसह संकटकाळी इतरांच्या बचाकासाठी प्राणाची बाजी लावणाऱया आणि आगीसारख्या दुर्घटनेत सर्वात पुढे राहणाऱयांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने भर घातली आहे. या पदकामुळे राज्याच्या लौकिकात भर घातली आहे. या सर्वांची कामगिरी पुढे अनेकांना प्रेरणादायी ठरेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या