LIVE – अनावश्यक गर्दी टाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन

5849

कोरोनाचा जगभरातील फैलाव अजूनही नियंत्रणात येत नाहीये. अमेरिकेमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या आता एक लाखाच्या पलिकडे पोहोचली आहे. हिंदुस्थानात कोरोनाग्रस्तांचा आकडा हा 1300 च्या पलिकडे गेला असून मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या ही 38 झाली आहे. वारंवार आवाहन करूनही काही नागरीक घराबाहेर पडताना दिसत आहेत. मजुरांचे लोंढे भीतीने स्थलांतर करत आहेत. कोरोनाच्या फैलावाशिवाय या दोन बाबी सरकारसाठी चिंतेची गोष्ट बनल्या आहेत. जगभरात सध्या कोरोनामुळे घडणाऱ्या सेकंदा,सेकंदाला घडणाऱ्या प्रत्येक घटनेचा आढावा आपल्याला इथे वाचायला मिळेल.

  • हे युद्ध आहे आणि आपण ते जिंकणारच – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • अनावश्यक गर्दी टाळा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कळकळीचे आवाहन
  • थोडीशी गैरसोय झाल्याबद्दल क्षमस्व
  • जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होणार नाही
  • स्थलांतरित मजुरांची संपूर्ण जवाबदारी महाराष्ट्र राज्याची
  • दोन लाख मजुरांची जेवण्याची सोय करण्यात आली आहे.
  • स्थलांतरित मजूरांनी आहे त्या ठिकाणी थांबावे
  • थंड पाणी, सरबत पिण्याचे टाळा, सर्दी खोकला होऊ नये यासाठी प्रयत्न करा
  • गरम झाल्यास एसी सुरू करू नका, खिडक्या उघड्या ठेवा. एसी वापरण्यास टाळा
  • कृपा करून आपली यात्रेची माहिती लपवू नका
  • परिस्थिती समजून सहकार्य करावे
  • कोरोनाला आपण धैर्याने तोंड देत आहोत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
  • कुणाचेही वेतन कापले जाणार नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
 • दिल्लीच्या हजरत निजामुद्दीन मरकज येथे हजेरी लावण्यार्‍या 45 जणांना कोरोनाची लागणदेशात लॉकडाऊन जारी करण्यात आला असताना दिल्लीच्या निजामुद्दीन भागात तबलीगी मरकज  इमारतीत दीड हजारहून अधिक लोक उपस्थित होते. त्यात तमिळ नाडूचेही काही लोक उपस्थित होते. तमिळनाडूच्या ४५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे.
 • राज्यात 72 जणांना कोरोनाची लागण, रुग्णांची संख्या 302 वर

 

महाराष्ट्रात 72 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 302 झाली आहे. मुंबईत 59 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 3 नगर, दोन पुणे तर ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई विरारमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे.

  • मक्का मदिना बंद होऊ शकते तर हिंदुस्थानातल्या मशिदी का नाही? जावेद अख्तरमुस्लिम समाजाचे पवित्र स्थान मक्का आणि मदिना बंद होऊ शकतात तर  हिंदुस्थानातल्या मशिदी का बंद नाही होऊ शकत असा खरमरीत सवाल गीतकार जावेद अख्तर यांनी विचारला आहे. तसेच दारूल उलूमने मशीदी बंद करण्याचा जो फतवा जारी केला आहे तो योग्य असल्याचेही जावेद अख्तर यांनी म्हटले आहे.

 • रेल्वेच्या 20 हजार कोचेसचे विलगीकरण कक्षात रुपांतर

 

रेल्वेच्या 20 हजार कोचेसाचे रुपांतर विलगीकरण कक्षात केले आहे. कोरोनाशी लढण्यासाठी या कोचेसचा मोठा उपयोग होणार आहे.

 • पंजाबमध्ये कोरोनामुळे 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू, पंजाबमध्ये आतापर्यंत 4 रुग्णांचा मृत्यू

 

 • जामखेड मधील आणखी एका व्यक्तीला कोरोनाची लागण

  जामखेड मधील तीन व्यक्तींना कोरोनाची लागण झाली आहे. जामखेड येथे थांबलेल्या परदेशी व्याकिंच्या संपर्कात या व्यक्ती आल्याने त्यांना कोरोनाची लागण झाले आहे. जिल्ह्यात आता एकूण कोरोनाबधितांची संख्या 8 वर पोहोचली असून एक रुग्ण बरा झाला असून त्याला घरी सोडण्यात आले आहे.

 • एप्रिल फूल निमित्त अफवा पसरवू नका, गृहमंत्र्यांचे आवाहन

 

उद्या एक एप्रिल आहे. त्यामुळे कुठल्याही अफवा पसरवू नका असे आवाहन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे. तसेच कोणी अफवा पसरवल्यास कडक कारवाई केली जाईल असेही अनिल देशमुख यांनी सांगितले.

 • परराज्यातून कामासाठी महाराष्ट्रात आलेल्या कामगार, मजूर यांनी मुंबई सोडू नये. त्यांच्यासाठी अन्न आणि निवाऱ्याची सोय करण्यात येत आहे. जिथे आहात तिथेच थांबा- गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन
 • कर्नाटक राज्यात 98 जणांना कोरोनाची लागण. तीन जणांचा मृत्यू तर सहा जणांना डिस्चार्ज. गेल्या काही तासात 10 नवीन रुग्णांची भर

 • कश्मीरमध्ये सहा कोरोना ग्रस्त आढळले. आधीच्या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात असल्याने झाली लागण
 • दिल्ली येथे बाबरपूर परिसरात प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टराला कोरोनाची लागण
 • प्रसिद्ध कुस्तीपटू राहुल आवारे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला 2 लाख रुपये देत असल्याचं जाहीर केलं आहे.
 • गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी मुख्यंमत्री निधीला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लतादीदींचे याबद्दल आभार मानले आहेत.
 • तिरूमला ऑईल व कुटे समूहाच्यावतीने कोरोनाविरोधातील लढ्यासाठी पंतप्रधान सहाय्यता निधी तसेच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला प्रत्येकी 10 लाख अशी एकूण 20 लाख रुपयांची मदत दिली आहे

 

 • कोरोना विरोधातील लढाईसाठी जी एस महानगर बँकेने मुख्यमंत्री सहाय्यता निधीत 35 लाख रुपये दिले

 • अमेरिकेत सोमवारी 540 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, मृतांची एकूण संख्या 3017 झाली

 • पाचातील 4 कोरोनाग्रस्त हे मुंबईतील तर 1 रुग्ण पुण्यातील आहे
 • महाराष्ट्रात कोरोनाग्रस्तांची संख्या 230 झाली

 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या मंगळवारी 10 ने वाढली
 • मरकस मशिदीचे विश्वस्त जुम्मा खान नबाब खान पठाण व सलीम बाबूलाल पठाण यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल
 • जिबूती,बेनीम,डेकोर्ट,घाना देशाच्या नागरिकांचा समावेश
 • जमावबंदीचा आदेश झुगारून परदेशी नागरिकांना मशिदीत एकत्र केले, नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
 • ट्विटरद्वारे दिली माहिती

 • कोरोनाविरूद्धच्या लढ्यासाठी क्रिकेटपटू रोहित शर्मा याची 80 लाख रुपयांची मदत
 • कोरोनावरून एप्रिल फुलचे मेसेज पाठवणाऱ्यांवर कारवाई होणार

 • दिल्लीतील निजामुद्दीन इथल्या मरकज भवनातील 24 जणांना कोरोनाची लागण झाल्याची तिथल्या आरोग्यंमंत्र्यांची माहिती

 • पोलिसांनी जप्त केल्या 300 मोटारसायकल

 • सांगली शहरात नियम मोडून बाहेर फिरणाऱ्यांविरोधात कारवाई
 • पश्चिम बंगालमध्ये कोरोनाग्रस्ताचा मृत्यू
 • महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ

 • केरळमध्ये कोरोनामुळे दुसरा मृत्यू

 • ही माहिती कळवल्याचा राग आल्याने दोघांनी ही हत्या केली

 • हे दोघे जण महाराष्ट्रातून परतले होते, ज्यांची माहिती मृतकाने कोरोना मदत केंद्राला कळवली होती
 • बिहारमधल्या एका माणसाची दोन जणांनी मिळून हत्या केली आहे
 • दिल्लीतील तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी 10 जणांचा मृत्यू

 • गुजरातमध्ये तृतीयपंथियांनी गरजूंना शिधावाटप केले

 • मजुरांना कोरोनाची लागण झालेली नाही, तरीही ते इतरांपासून विलग होऊन गावाबाहेरील शेतात राहात आहेत

 • केरळवरून परतल्यानंतर ओडिशातील 12 मजुरांनी स्वत:ला इतरांपासून विलग केलं
 • कष्टकरी मजुरांचा समजूतदारपणा
 • हिंदुस्थानात गेल्या 24 तासात 227 पेक्षा अधिक कोरोनाबाधित सापडले
 • सगळे नागरीक हे अंदमानचे रहिवासी आहेत
 • दिल्लीमध्ये मुसलमानांच्या धार्मिक कार्यक्रमात गेलेल्या 10 जणांना कोरोनाची लागण
आपली प्रतिक्रिया द्या