१४ जुलैला उरण मधील सी. एन. जी. गॅस पंपाचे पालकमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । चिरनेर

महानगर गॅस आणि इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या सहकार्याने १४ जुलै २०१८ रोजी सकाळी १०:३० वाजता रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या शुभहस्ते उरण – पनवेल रोडवरील फुंडे हायस्कूल येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंप येथे लोकार्पण करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमासाठी भाजपाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेलचे आ. प्रशांत ठाकुर, शिवसेनेचे रायगड जिल्हाध्यक्ष व उरणचे आ. मनोहर भोईर, महानगर गॅसचे व्यवस्थापकीय संचालक, इंडियन ऑईल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक, जेएनपीटीचे विश्वस्त महेश बालदी आणि फुंडे ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. जयवंती म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मागील काही महिन्यांपूर्वी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी उरण शहरातील घरोघरी पाईपलाईन द्वारे गॅस पुरवठा करण्याच्या उदघाटन प्रसंगी उरण येथे आले असता सी.एन.जी.गॅस पंप सुरू करण्याचे अभिवचन दिले होते. ते खऱ्या अर्थाने पूर्ण झाल्याचे समाधान उरणवासीयांना मिळाले असून उरण तालुक्यातील सी.एन.जी.वाहन धारकांचे इंधन व वेळ वाचणार आहे. या पूर्वी पनवेल, सी.बी.डी. आणि नेरुळ येथे २२ किमी अंतरावर वाहन धारकांना जावे लागत होते.