उद्योगांना मंजूर झालेला कोळसा विकला खुल्या बाजारात, 30 ट्रक पकडले

497

चंद्रपूरमध्ये लघु व मध्यम उद्योगांना मंजूर झालेला कोळसा वाहतुकदारांनी खुल्या बाजारात विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. चंद्रपूर पोलिसांनी आज केलेल्या कारवाईत सुमारे 30 ट्रक पकडले.

चंद्रपूरमध्ये काही व्यापारी उद्योगांच्या नावावर खाणीतून उच्चर प्रतीचा कोळसा घ्यायचे. तो उद्योजकांना विकण्याऐवजी खुल्या बाजारात दुप्पट किंमतीत विकला जायचा. या घोट्याळयात कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र हा कोळसा या उद्योगांपर्यंत पोहोचतो की नाही, याची शहानिशा हे महामंडळ कधीच करीत नाही. त्यामुळं उद्योगांसाठी वाहतुकीचं काम सांभाळणारे कंत्राटदार ही चोरी खुलेआम करतात, अशी माहिती समोर आली आहे. पोलिसांनी अजूनपर्यंत गुन्हा दाखल केलेला नाही. या प्रकरणी पोलिसांनी 30 ट्रक पकडले असून दस्तावेजांची पडताळणी सुरू असल्याचे सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या