नाशिक – नव्वद लाखांचे कोकेन हस्तगत; तिघांना अटक

893

सिन्नर फाटा येथील साठेनगर येथे गुन्हे शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी नव्वद लाखांचा कोकेन या अंमली पदार्थाचा साठा जप्त केला. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.

नाशिक शहर पोलिसातील गुन्हे शाखा युनिट-2मधील पोलीस हवालदार युवराज पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सिन्नर फाटा येथील साठेनगरजवळ शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास सापळा रचला. एक संशयित आल्यानंतर त्याला भेटण्यासाठी आणखी दोघे आले, त्यांच्यात काहीवेळ चर्चा झाली. एका संशयिताने स्वत:जवळील बॅगेतील प्लॅस्टिक पिशवी काढून दोघांना देताच पोलिसांनी या तिघांना पकडले. त्या प्लॅस्टिक पिशवीत कोकन नावाचा अंमली पदार्थ असून, त्याची किंमत सुमारे 89 लाख 78 हजार पाचशे रूपये इतकी आहे, असे तपासी पथकाने सांगितले. उत्तर प्रदेशातील फिरोजाबादच्या स्वाहानगर येथील मनोजकुमार जयप्रकाश यादव (33), नाशिकच्या सातपूरमधील जाधव संकुल येथील साहेबजान साबीदअली शेख (41), सिन्नर फाटा येथील गजानन पार्कमधील नितीन साहेबराव खोडके (37) या तिघांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील, शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट-2चे निरीक्षक दिनेश बर्डेकर, सहाय्यक निरीक्षक श्रीराम पवार, अभिजित सोनवणे, वसंत खतेले, उपनिरीक्षक विजय लोंढे, सहाय्यक उपनिरीक्षक शामराव भोसले, राजेंद्र जाधव, हवालदार श्रीराम सपकाळ, युवराज पाटील, रमेश घडवजे, देवकिसन गायकर, मधुकर साबळे, संतोष ठाकुर, पोलीस नाईक ललिता आहेर, संजय ताजणे, विजय पगारे, महेंद्र साळुंखे, यादव डंबाळे, गौरव गवळी, योगेश सानप यांच्या पथकाने ही कामगिरी पार पाडली.

आपली प्रतिक्रिया द्या