जिल्हाधिकारी कार्यालयातून प्लास्टिक पाण्याच्या बाटल्या हद्दपार

573

राज्यात प्लास्टिक बंदी लागून दोन वर्षे झाली असली तरी अनेक शासकीय कार्यालयातही प्लास्टिक बाटल्याचा सर्रास वापर होताना दिसत असतो. मात्र याला जिल्हाधिकारी कार्यालय अपवाद ठरले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात शासकीय बैठक, पत्रकार परिषदवेळी आता प्लास्टिक बाटल्या हद्दपार झाल्या असून स्टीलच्या बाटल्या पाणी पिण्यास दिल्या जात आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालय प्लास्टिक बाटल्या मुक्त झाले आहे.

माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी शासनातर्फे प्लास्टिक बंदी लागू केली होती. मात्र प्लास्टिक बंदीला अजून हवा तसा प्रतिसाद नागरिकांकडून मिळालेला दिसत नाही. जिल्हा प्रशासन असो अथवा स्थानिक प्रशासन असो यांनी प्लास्टिक बंदीसाठी जिल्ह्यात जनजागृती करण्याचे प्रयत्न केलेले आहेत. मात्र तरीही प्लास्टिक बंदीला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांचा प्रतिसाद मिळत नसला तरी शासकीय कार्यालयातही प्लास्टिक पाण्याच्या बाटल्याचा वापर होताना अजूनही दिसत आहे. शासनाच्या कार्यलयातच प्लास्टिक बंदीला हरताळ असल्याने नागरिकाना बोलून उपयोग नाही.

जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी प्लास्टिक बंदीचे स्वागत केले असून कार्यालयात प्लास्टिक बाटल्यांना हद्दपार केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मिल्टनच्या स्टीलच्या बाटल्यातून पाणी दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात होत असलेल्या शासकीय बैठका, जिल्हा नियोजन बैठक अथवा पत्रकार परिषद वेळी येणाऱ्या अधिकारी, पत्रकारांना आता स्टीलच्या बाटल्यामधून पिण्याचे पाणी दिले जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने प्लास्टिक बाटल्या हद्दपार केल्या असुम जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालयानीही आता प्लास्टिक बाटल्या हद्दपार करण्यासाठी पावले उचलणे गरजेचे आहे.

आपली प्रतिक्रिया द्या