विराज उद्योग समूहाच्या सर्व प्लांटचे उत्पादन बंद करण्याचे आदेश

1704

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जीवनावश्यक वस्तू वगळता इतर सर्व उद्योगधंदे बंद करण्याचे आदेश सरकारने दिले होते. मात्र, कन्ट्युनियस प्रोसेस प्लांटमधील काही उद्योगधंदे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांची मान्यता घेऊन सुरु ठेवण्याची तरतुद असल्याने, असे उद्योग सुरु ठेवण्यासाठी जिल्हा दंडाधिकारी यांच्याकडे अर्ज करणे गरजेचे आहे. अशा अर्जाबाबत जिल्हादंडाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या सल्लामसलती नंतर परवानगी देतात. अशी परवानगी मिळाल्यानंतर उत्पादन सुरु ठेवता येते.

तारापूर औद्योगिक क्षेत्रातील में. विराज प्रोफाईल लि. या कंपनीचे उत्पादन कन्ट्युनियस प्रोसेस प्लांट या प्रकारात मोडत असल्याचे सांगत या कंपनीने त्यांचे सर्व प्लांट चालू ठेवले होते. तर या ठिकाणी 1219 हून अधिक कामगार कामावर आहेत. या गैर प्रकारावर शासनाकडे व जिल्हाधिकारी पालघर यांच्याकडे वारंवार तक्रारी येत होत्या. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी पालघर यांनी, विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र शासन यांनी ई-मेलद्वारे कन्ट्युनियस प्रोसेसमध्ये असणाऱ्या उद्योगांना परवानगी घेण्याबाबत निश्चित केलेल्या कार्यपध्दतीप्रमाणे विराज प्रोफाईल लि. कंपनीस ऑनलाइन अर्ज करण्यास कळविले होते. परंतु या कंपनीने अध्याप अर्ज न करता प्लांट सुरुच ठेवले होते. कोरोनाचा संसर्ग व प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकार यांनी वेळोवेळी दिलेले आदेश/मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे कंपनीला बंधनकारक असताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष करत व हजारो कामगारांसह परिसरातील लाखो लोकांच्या जीवाला धोका असताना प्लांट सुरु ठेवण्यात आले होते.

विराज प्रोफाईल्स प्रा.लि. तारापूर या कंपनीने केंद्र शासन व राज्य शासन यांनी कोरोना रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण करण्यासाठी देण्यात आलेले आदेश/निर्देश, नियमामार्गदर्शक सुचना यांची अंमलबजावणी केलेली नाही. या नियमांचे उल्लंघन करत किमान मनुष्यबळाचा वापर न करता उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवून, केंद्र व राज्य सरकार यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करुन कंपनीने उत्पादन प्रक्रिया सुरु ठेवल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी उत्पादन प्रक्रिया बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या