
जबलपूरमधील एका टेक इन्स्टिट्यूटमधील एका विद्यार्थिनीला वसतिगृहाच्या बाथरूममध्ये इतर मुलींचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केल्याबद्दल आणि ते दिल्लीतील तिच्या प्रियकरासह शेअर केल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी ही दुसऱ्या वर्षाची विद्यार्थिनी आहे. ही विद्यार्थिनी दोन वर्षांपासून गुप्तपणे असे व्हिडीओ घेत होती आणि एका विद्यार्थिनीला तिच्यावर संशय आला आणि तिने संबंधित विद्यार्थिनीला रंगेहाथ पकडले.
रविवारी, एका विद्यार्थिनी आंघोळ करत असताना तिला भीती वाटली की दुसरी विद्यार्थिनी दुसऱ्या बाथरूममध्ये पाईपवर उभी आहे आणि वरून तिचे रेकॉर्डिंग करत आहे. तिने ताबडतोब अलार्म वाजवला आणि कॉलेज आणि वसतिगृह व्यवस्थापनाला घटनेची माहिती दिली.
सोमवारी सकाळी, दुमना पोलीस चौकीत मोठ्या संख्येने विद्यार्थी महिलेविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी जमले होते, परंतु त्यांना घटनेची तक्रार करण्यासाठी खमारिया पोलीस ठाण्यात जावे लागेल असे सांगण्यात आले.
खमारिया पोलीस ठाण्याच्या प्रभारी सरोजिनी टोप्पो यांनी सांगितले की, आरोपी विद्यार्थिनी महाराष्ट्रातील गोंदिया येथील आहे.
चौकशीदरम्यान, तिने सांगितले की तिची दिल्लीतील एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याशी सोशल मीडियावर मैत्री झाली होती आणि त्यांची मैत्री काही वेळातच प्रेमात बदलली. त्यांनी दोघांनी गुपचूपपणे विद्यार्थिनींचे व्हिडीओ रेकॉर्ड करण्याचा निर्णय घेतला. मग तिने तिच्या वसतिगृहातील सहकारी विद्यार्थिनींचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ रेकॉर्ड केले, अशी माहिती सरोजिनी टोप्पो यांनी दिली.
शहराचे एसपी रांझी सतीश कुमार साहू म्हणाले की, ‘गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि आरोपी विद्यार्थिनी पोलिसांच्या ताब्यात आहे. तिने सहकाऱ्यांच्या नकळत त्यांचे खासगी व्हिडीओ रेकॉर्ड केल्याप्रकरणी पोलीस चौकशी करत आहेत’.