कोलंबियाचा अमेरिकेला झटका, शस्त्रास्त्र खरेदी थांबवली!

जगातील सर्व देशांवर टॅरिफ बॉम्ब टाकत फिरणाऱ्या अमेरिकेला कोलंबियाने जोरदार दणका दिला आहे. कोलंबियाने अमेरिकेकडून शस्त्रास्त्र खरेदी थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. कोलंबियाचे गृहमंत्री अर्मांडो बेनेडेट्टी यांनी हा निर्णय जाहीर केला. अमेरिका कोलंबियाच्या देशांतर्गत राजकारणात हस्तक्षेप करत आहे. पुढील वर्षीच्या निवडणुकीपूर्वी कोलंबियात ’होयबा अध्यक्ष’ बसवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे, असा आरोप बनेडेट्टी यांनी केला आहे. कोलंबिया हा अमेरिकेचा सर्वात मोठा लष्करी भागीदार आहे. त्यामुळे अमेरिकेला हा मोठा धक्का आहे. स्थलांतरितांच्या मुद्द्यावरून आधीच दोन देशांत वाद सुरू आहे. आता त्यात नवी भर पडली आहे.