शिवसेनेचा दणका!  मराठीद्वेष्ट्या जान कुमारच्या वक्तव्या प्रकरणी कलर्स वाहिनीने मागितली माफी

कलर्स हिंदीवर सध्या बिग बॉसचा चौदावा सिझन सुरू आहे. या  कार्यक्रमातील स्पर्धक जान कुमार याने नुकताच एका एपिसोडमध्ये मराठीद्वेष्ट्ये वक्तव्य केले होते. त्याच्या या वक्तव्यानंतर शिवसेना आमदार प्रताप सरनाईक व शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी जान कुमारने जाहीर माफी मागावी अशी मागणी केली होती. त्यानंतर कलर्स वाहिनीने त्यांच्या ट्विटर हँडलवरून  जाहीर माफी मागितली आहे.

जान कुमारने बिग बॉसच्या 27 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये सह स्पर्धकाला मराठीत बोलू नको असा इशारा दिला होता. या कार्यक्रमातील महिला स्पर्धक मराठीत बोलत असताना जानने तिला रोखले व सांगितले. मराठीत बोलू नको मला या भाषेची चीड आहे जर तुझ्यात हिम्मत असेल तर हिंदीत बोल. त्याचे हे वक्तव्य मराठीतद्वेष्ट्ये असून कलर्स वाहिनीने देखील ते एडिट न करता कार्यक्रमात दाखवले.

याप्रकरणी शिवसेनेचे आमदार प्रताप नाईक यांनी कलर्स वाहिनी बिग बॉस शो ला चांगलेच फटकारले आहे. ‘बिग बॉस हा शो महाराष्ट्र चित्रित होतो. त्याला टी आर पी मराठी लोकांकडून मिळतो. जान कुमार सानूने मराठी लोकांचा अपमान केला आहे. त्यामुळे हा अपमान आम्ही सहन करणार नाही. कुमार सानू यांनी महाराष्ट्रात त्यांचे करिअर घडवले. त्यांचा मुलगा मराठी भाषेचा अपमान करत असेल. तर ते आम्ही सहन करणार नाही’ असे ट्विट सरनाईक यांनी केले आहे.

तसेच शिवसेना सचिव आदेश बांदेकर यांनी देखील कलर्सने जाहीर माफी मागावी अन्यथा महाराष्ट्र शासनाने चित्रीकरणाची परवानगी रद्द करावी, अशी मागणी केली होती.

या घटनेनंतर कलर्स वाहिनी कडून माफीनामा माफी मागण्यात आली आहे. कलर्सने त्यांच्या अधिकृत हँडल वरून माफी मागितली आहे. ‘बिग बॉस मध्ये मराठीतील मराठी विषयी केलेल्या वक्तव्यावर विषयी आम्ही माफी मागतो महाराष्ट्रातील लोकांच्या जनतेच्या भावना दुखावण्याचा कोणताही आमचा हेतू नव्हता’ असे ट्विट कलर्स कडून करण्यात आले आहे

आपली प्रतिक्रिया द्या