सन्मिता धापटे-शिंदे ठरली महागायिका

कलर्स मराठीवरील ‘सूर नवा ध्यास नवा’ची महागायिका होण्याचा मान नगरच्या सन्मिता धापटे-शिंदेने मिळवला आहे. कलर्स मराठीतर्फे दोन लाख रुपये, मानाची सुवर्ण कटय़ार तिला मिळाली आहे. रविवारी पार पडलेल्या महाअंतिम फेरीत विजेत्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ‘सूर नवा ध्यास नवा’ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासून यातील स्पर्धकांनीनी आपल्या सुंदर गायकीने अवघ्या महाराष्ट्राची मने जिंकली. 16 सुरेल गायिकांचा प्रवास सुरू झाला आणि या प्रवासात स्पर्धकांना बरेच काही शिकायला मिळाले. याच स्पर्धकांमधून कार्यक्रमाच्या मंचाला अंतिम सहा शिलेदार मिळाले. या स्पर्धेत दुसरा क्रमांक कोल्हापूरची संपदा माने हिने तर तिसरा क्रमांक बारामतीची राधा खुडे हिने पटकावला आहे. त्यांना अनुक्रमे एक लाख रुपये आणि पंच्याहत्तर हजार रुपयांचा धनादेश तसेच स्मृतिचिन्ह देण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या