घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेच्या चौकशीसाठी समिती

घाटकोपर येथे होर्डिंग पडून झालेल्या दुर्घटने प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीसाठी सरकारकडून महिनाभरानंतर समिती नेमण्यात आली आहे. उच्च न्यायालयाचे निवृत्त मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली आहे.

या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश सरकारकडून देण्यात आले असून दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती चौकशी करणार आहे. समितीची कार्यकक्षा व रचना गृह विभागाकडून स्वतंत्रपणे ठरविण्यात येणार आहे.