‘कम्युनिटी रेडिओ’ या उपक्रमामुळे कैद्यांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे आढळून आल्याने याची गंभीर दखल घेण्यात आली आहे. हा उपक्रम आता राज्यातील सर्व कारागृहांमध्ये राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नागपूर, येरवडा, नाशिक, कोल्हापूर या मध्यवर्ती कारागृहांमध्ये कैद्यांना याआधीच ‘कम्युनिटी रेडिओ’ हा उपक्रम सुरू करण्यात आला होता. या उपक्रमामुळे या कारागृहातील कैद्यांच्या मानसिकतेत सकारात्मक बदल झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे याता राज्यातील सर्व कारागृहातील कैद्यांसाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.