एअरसेल-मॅक्सिस घोटाळा तपास 4 मेपर्यंत पूर्ण करा!

248
delhi-high-court

एअरसेल-मॅक्सिस घोटाळय़ाप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम आणि त्यांचा मुलगा कार्ती यांच्याविरुद्ध तपास पूर्ण करण्यासाठी दिल्लीतील एका न्यायालयाने सीबीआय आणि अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) 4 मेपर्यंतचा वेळ दिला आहे.

ईडीने विशेष न्यायमूर्ती अजयकुमार कुहाड यांना सांगितले की, याप्रकरणी चार देशांना अनुरोध पत्रे पाठवली आहेत, त्यांचे उत्तर येणे बाकी आहे. त्यानंतर न्यायालयाने सीबीआय आणि ईडीला हा तपास 4 मेपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश दिले. सीबीआय आणि ईडीने मागणी केल्यावर ही अनुरोध पत्रे न्यायालयच जारी करते. तशी ती जारी करून चार देशांना पाठविण्यात आली आहेत. त्यांची उत्तरे अजून आलेली नाहीत.

सीबीआय आणि ईडीकडून दाखल करण्यात आलेल्या एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याच्या खटल्याची सुनावणी दिल्ली उच्च न्यायालयाने 28 जानेवारीला पुन्हा सुरू केली आहे. गेल्या वर्षी 5 सप्टेंबर रोजी न्यायालयाने ही सुनावणी अनिश्चित काळासाठी तहकूब केली होती.

आपली प्रतिक्रिया द्या