भगवे वस्त्र नेसून मंदिरात बलात्कार होतात, दिग्विजय सिंह यांचे संतापजनक वक्तव्य

1843
digvijay-singh


वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेले काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. भोपाळ येथे एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावणारे संतापजनक असे वक्तव्य केले आहे. आज, भगवे वस्त्र नेसून बलात्कार केले जात आहेत, मंदिरांमध्ये बलात्कार होत आहेत, हा आपला धर्म आहे?, असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या अशा प्रश्नामुळे हिंदू समाजात त्यांच्याविरोधात संतापाची लाट उसळली आहे.

दिग्विजय सिंह हे भाषणात सरकार टीका करताना हिंदू धर्मावर घसरले. ‘भगवे वस्त्र नेसून लोक चूर्ण विकताहेत, देवळांमध्ये बलात्कार होत असल्याचे वक्तव्य केले. ज्यांनी या सनातन धर्माची बदनामी केली आहे, त्यांना देव सुद्धा माफ करणार नाही’, असे म्हणत त्यांनी आपल्या आधीच्या विधानाची सारवासारव करण्याचा प्रयत्न केला.

आपली प्रतिक्रिया द्या