
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने आज विभागीय प्रभारी नियुक्त केले. ज्येष्ठ नेत्यांवर प्रभारी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.
कोकण विभाग प्रभारी म्हणून माजी मंत्री, काँग्रेस वार्ंकग कमिटीचे सदस्य नसीम खान यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नागपूर विभागाची जबाबदारी विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, काँग्रेस वार्ंकग कमिटीचे सदस्य माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडे उत्तर महाराष्ट्र, अॅड. यशोमती ठाकूर यांच्याकडे अमरावती तर मराठवाडा प्रभारी म्हणून माजी मंत्री व आमदार अमित देशमुख यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. गणेश पाटील यांनी दिली.




























































